Join us

नेरळ-माथेरान घाट रस्ता धोकादायक होतोय

By admin | Updated: July 20, 2014 22:59 IST

सध्या माथेरान या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कारण पावसाळ्यातील तेथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करीत आहे .

नेरळ : सध्या माथेरान या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कारण पावसाळ्यातील तेथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करीत आहे . मात्र मिनीट्रेन बंद असल्याने सर्व पर्यटक ज्या नेरळ - माथेरान घाट रस्त्याने माथेरानला येतात त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे जुम्मापट्टी परिसरात पडले आहेत, त्यातच आता तब्बल दोन ठिकाणी रस्ता खचला आहे . दरम्यान, रस्त्याची देखरेख करणाऱ्या कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची तयारी दाखिवली आहे . नेरळ - माथेरान घाट रस्ता मिनीट्रेन चा संप चालू होता, तेव्हा लोकांनी श्रमदानातून तयार केला होता . त्या घटनेला आता चाळीस वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर राज्य सरकारने हा रस्ता कोकण विकास निधी अंतर्गत रु ंद केल्यानंतर सातत्याने माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत गेली. आता वर्षाकाठी नऊ लाख पर्यटक माथेरानला पर्यटनासाठी येतात. त्या माथेरानमध्ये पर्यटकांना सर्वाधिक आवडीचा पर्यटन हंगाम मागील काही वर्षात पावसाळा ठरत आहे. कारण पावसाळ्यात येथील वातावरण मनाला नव्याने स्फूर्ती देणारे असते . परिणामी वीकेंडला माथेरान पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून गेलेले दिसते. हे सर्व पर्यटक पावसाळ्यात मिनीट्रेन बंद असल्याने नेरळ - माथेरान घाट रस्त्याने येतात. दरवर्षी पावसाळ्यात हीच स्थिती होते.