मुंबई : अंधेरीतल्या रहिवासी सोसायटीतल्या लीफ्टमध्ये तिघांकडून अल्पवयीन तरूणीवर घडलेल्या विनयभंगाच्या तपासात एमआयडीसी पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. लीफ्टमध्ये तरूणीचा शेजारी उपस्थित होता. त्याने संपूर्ण घटना आपल्या डोळयांनी पाहिली मात्र ती रोखण्याचा जराही प्रयत्न केला नाही. पुढे या तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हददीतल्या एसआरए इमारतीत दोन दिवसांपुर्वी ही घटना घडली. रात्री साडेआठच्या सुमारास ही तरूणी तिसऱ्या माळयावरील आपल्या घरी जात होती. लीफ्टमध्ये तरूणीसह याच इमारतीत राहाणारे तीन आरोपी आणि शेजारी असे पाचजण होते. लीफ्टचे दरवाजे बंद होताच एका आरोपीने तरूणीशी अश्लिल चाळे सुरू केले. तीने प्रतिकार केला. शेजाऱ्याला मदतीचे आवाहन केले. मात्र शेजारी निर्विकारपणे हा प्रकार पाहात होता. त्याने या तरूणीला तिघांच्या तावडीतून सोडविण्यासाठी काहीच धडपड केली नाही. हे पाहून तरूणीनेच तिसऱ्या माळयावर लीफ्ट थांबविण्यासाठी कसोशिने प्रयत्न केला. मात्र मुख्य आरोपीच्या दोन साथीदारांनी लीफ्टचे दरवाजे उघडले जाणार नाहीत याची काळजी घेतली. पुढे लीफ्ट सातव्या माळयावर थांबली तेव्हा तरूणी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटली. या प्रकरणी पोलिसांनी तीन्ही आरोपींना अटक केली. दरम्यान पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब नोंदवून घेतला. त्याने आपल्या जबाबात हा प्रकार काही क्षणांमध्ये घडला. त्यामुळे काय करावे समजलेच नाही, असे सांगितल्याचे समजते. च्विनयभंगाचा हा प्रकार ऐकून तरूणीच्या बहिणींनी तीन्ही आरोपींच्या पालकांना जाब विचारला. तेव्हा पालकांनी या तरूणीवरच आरोप केले. त्यामुळे दुखावलेल्या तरूणीने कपडे धुण्याची पावडर मिश्रित पाणी पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
शेजाऱ्याने निर्विकारपणे पाहिला विनयभंग
By admin | Updated: January 23, 2015 01:57 IST