Join us

घाटकोपरमध्ये शेजाऱ्यांनी केली तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 02:00 IST

रागातून शेजारी राहत असलेल्या दोघांनी अश्विनी उर्फ सोनू कुमार दुबे (२९) याला मारहाण करून हत्या केल्याची घटना घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज परिसरात घडली.

मुंबई : पगार झाला नसल्याचे खोटे सांगितल्याच्या रागातून शेजारी राहत असलेल्या दोघांनी अश्विनी उर्फ सोनू कुमार दुबे (२९) याला मारहाण करून हत्या केल्याची घटना घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज परिसरात घडली. या प्रकरणी नरेंद्र राणे व राहुल राऊत यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली.भीमनगरातील थोरात चाळीमध्ये दुबे कुटुंब राहते. त्यांचा मुलगा सोनूला एक महिन्यापूर्वी राणे व राऊत यांच्या ओळखीतून मरोळ परिसरात एके ठिकाणी नोकरी मिळाली होती. पण एक महिना झाला तरी पगार झाला नसल्याचे त्याने घरी सांगितले. त्यामुळे त्या दोघांच्या मनात त्याचा राग होता, त्यामुळे या दोघांनी त्याला घराबाहेर बोलावत मारहाण केली.