Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्यानेच केली घरफोडी

By admin | Updated: May 4, 2017 06:36 IST

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त शेजारी गावाला गेल्याची संधी साधत, एका शेजाऱ्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने शेजाऱ्याचेच

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त शेजारी गावाला गेल्याची संधी साधत, एका शेजाऱ्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने शेजाऱ्याचेच घर फोडल्याची घटना गोवंडी येथे सोमवारी रात्री घडली. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत, आफताफ शेख (२४) या आरोपींसह दोन अल्पवयीन मुलांनादेखील अटक केली आहे.शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनीत राहणारे रमाजन सिद्दिकी हे उन्हाळाच्या सुट्टीनिमित्त गावी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप असल्याने चोरीच्या उद्देशाने सोमवारी रात्री अफताफने त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडली. सोबतीला त्याने याच इमारतीमधील दोन अल्पवयीन मुलांनादेखील घेतले होते. घरात प्रवेश केल्यानंतर, घरातील कपाटामधील काही रोख रक्कम आणि काही मुद्देमाल असा एकूण ५ लाखांचा ऐवज घेऊन आरोपींनी पळ काढला. मंगळवारी सकाळी रहिवाशांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर, त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. एका आरोपीच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)