Join us

एशियाटिक लायब्ररीचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 02:39 IST

भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

मुंबई : एशियाटिक सोसायटीला एकेकाळी वैभव प्राप्त झाले होते. आज हा पुस्तकांचा अनमोल खजिना दुलर्क्षित होताना दिसत आहे. अशा स्थितीत हा खजिना जतन करण्यासाठी एशियाटिक ग्रंथालयाचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. त्यासाठी आरखडा तयार करावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचा २१६वा वर्धापन दिन कार्यक्रम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हाइस ॲडमिरल अजित कुमार, सोसायटीचे विश्वस्त अनिल काकोडकर, अध्यक्ष प्रो. विस्पी बालपोरीया आणि सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे शिवाजी महाराज, संत रामदास स्वामी अशा थोर पुरुषांची भूमी आहे. या भूमीत एशियाटिक ग्रंथालय असून त्यात ऐतिहासिक पुस्तकांचा आणि साहित्याचा अनमोल ठेवा जतन केला जात आहे. ही अभिमानाची बाब आहे. अशा ॉऐतिहासिक खजिन्याचे जतन करणे ही राज्यशासनाची जबाबदारी आहे. हे ग्रंथालय नष्ट न होऊ देता, त्याचे पुनरुज्जीवन करण्याची गरज असून तसा आराखडा तयार करावा. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासन तसेच राज्यपाल निधीतून आर्थिक साहाय्य देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

या ग्रंथालयामध्ये एक लाखापेक्षा जास्त पुस्तके आहे त्यापैकी  १५ हजार दुर्मीळ आणि मौल्यवान पुस्तके असून प्राचीन, आधुनिक भारतीय आणि युरोपीयन भाषांमधील विविध पुस्तकांचा समावेश आहे. तीन हजारहून अधिक मनुस्मृतींचा ठेवा आहे. सोसायटीकडे १२ हजारहून अधिक नाणे संकलित केले आहे. असा ऐतिहासिक ठेवा असलेली संस्था लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली पाहिजे. या संस्थेला पुन्हा पौराणिक महत्त्व प्राप्त होईल आणि त्यास गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी  संविधान दिन आणि २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.

टॅग्स :मुंबईनवी मुंबई