Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोशी सत्र न्यायालयात दहा कोर्ट वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:06 IST

उच्च न्यायालयाच्या वकिलांचे सर्वोच्च न्यायालयाला पत्रलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिंडोशी सत्र न्यायालयात हा कोर्ट वाढविण्यात यावेत, अशी ...

उच्च न्यायालयाच्या वकिलांचे सर्वोच्च न्यायालयाला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दिंडोशी सत्र न्यायालयात हा कोर्ट वाढविण्यात यावेत, अशी मागणी उच्च न्यायालयाच्या वकिलांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीसांना लेखीपत्र दिले आहे.

मुंबई सत्र न्यायालयापेक्षा दिंडोशी सत्र न्यायालयात प्रलंबित प्रकरणांचे ओझे वाढत चालले आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या तुलनेत दिंडोशीत असलेली कोर्टाची संख्या पुरेशी नाही. पोस्को, रिमांड, तसेच अन्य याचिका न्यायालयात येत असतात. मात्र अपुऱ्या कोर्ट संख्येमुळे अशा शेकडो प्रकरणांचा निपटारा करणे शक्य होत नाही. अनेक आरोपी कारागृहात खितपत पडले आहेत, कारण खटला चालतच नाही. त्यामुळे जामीनही मिळत नाही किंवा पुढची तारीखही मिळण्यात अडथळा येतो. दिंडोशीतील १२ क्रमांकाचे कोर्ट सध्या बंद आहे. त्यामुळे याबाबत लक्ष देण्याची गरज आहे, असे उच्च न्यायालयाचे ॲड. किशोर जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीसांना पत्र दिल्याचेही स्पष्ट केले.

...................