Join us

हेल्पलाइनबाबत जनजागृती हवी

By admin | Updated: November 25, 2015 01:48 IST

मुंबईत दररोज हजारो महिला कामानिमित्त प्रवास करतात, कधी त्यांना कामासाठी जास्त वेळ कार्यालयात थांबावे लागते. त्याचप्रमाणे इतरत्रही फिरायला तसेच विविध कामांसाठी जाणाऱ्या महिलांना मदतीसाठी

मुंबई: मुंबईत दररोज हजारो महिला कामानिमित्त प्रवास करतात, कधी त्यांना कामासाठी जास्त वेळ कार्यालयात थांबावे लागते. त्याचप्रमाणे इतरत्रही फिरायला तसेच विविध कामांसाठी जाणाऱ्या महिलांना मदतीसाठी असणाऱ्या हेल्पलाइनबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कॉलेज तरुणींमध्ये १०३ सह विविध हेल्पलाइन बाबत अद्याप पुरेशी माहिती नाही. गृहिणींना बातम्यांमार्फत ही हेल्पलाइन माहिती आहे. या हेल्पलाइनबाबत तरुणी, गृहीणींना काही प्रमाणात विश्वासही वाटतो. परंतु यामध्ये सुधारणा करत याबाबत अधिक जनजागृती व्हावी असे त्यांचे म्हणणे आहे.पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात १५ जणांची टीम कार्यरत आहे. १०० क्रमांकाचे काम पाहणाऱ्या पथकाशेजारीच ही टीम कार्यरत आहे. मोहीम विभागाचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या नियंत्रणाखाली या हेल्पलाइनचे कामकाज सुरु आहे. विशेष म्हणजे येथे महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिला कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. या महिलांना कॉल हाताळण्यापासून महिलांशी कसे बोलावे याबाबतचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. कॉल च्या वाढत्या संख्येमुळे त्यांंना हेडफोन देण्यात आले आहेत. त्यामुळे कॉल हाताळण्यास महिला कर्मचाऱ्यांना मदत होत आहे. मोबाईल नेटवर्क सुधारण्यावर भरमहिलांसाठी वेळोवेळी नियंत्रण कक्षाकडून मदत देण्यात येते. त्यात काही क्वचित मोबाईल नेटवर्कमुळे कॉल दुसरीकडे जाण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र त्याही त्रुटी लवकरच दुर होणार आहेत. अत्याचाराला बळी न पडता महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावे. जेणेकरुन समाजकंटकांना आवर बसेल. पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत. त्यामुळे महिलांनी पुढे यावे.- संजय बारकुंड,( डीसीपी आॅपरेशन विभाग)चिंंचपोकळी स्थानकावर रात्री उशिरा टे्रनची प्रतिक्षा करत असताना, अचानक दोघे तरुण दारुच्या नशेत माझ्या दिशेने येताना दिसले. फलाटावर जास्त कोणी नसल्याने मला भिती वाटली. त्या दरम्यान या हेल्पलाइनबाबत माहिती नसल्याने मला काही सुचले नाही. तेवढ्यात टे्रन पकडून मी निघून गेली. हेल्पलाइनबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.- मृण्मयी सरेकर, माझगांव