Join us

राष्ट्रवादीच्या बंडखोर गटात फूट पडण्याची शक्यता ?

By admin | Updated: December 23, 2014 22:43 IST

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी बंडाखोर नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्या काही मागण्या मान्य करण्याबाबत चर्चा केल्याने

जव्हार : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी बंडाखोर नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्या काही मागण्या मान्य करण्याबाबत चर्चा केल्याने फुटीर १० नगरसेवकांच्या गटातच फूट पडण्याची शक्यता आहे.जव्हार नगरपरिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नगरसेवकांनी पक्षाने काढलेल्या व्हीप धुडकावत केलेले बंड व जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र गट स्थापन करीत असल्याचे सादर केलेले प्रतिज्ञापत्र यामुळे जिल्ह्णातील राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या या १० फुटीर नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात अविश्वासही दाखल केला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले असून त्यांच्याच आदेशाने ७ दिवसाच्या आत जव्हार नगरपरिषदेची सभा घेवून अविश्वास ठरावावर मतदान होणार. अविश्वास ठरावाची नामुष्की टाळण्यासाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष स्वत:हून राजीनामा देतात? की फुटीवर गटातच फूट पडणार? अशा विविध शक्यता सध्या चर्चिल्या जात आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांशी पटत नसल्याने आम्ही वेगळी चूल मांडली असली आहे याचा अर्थ आम्ही पक्ष सोडलेला नाही. आम्ही आजही राष्ट्रवादीतच आहोत असे बंडखोर नगरसेवक सांगतात. मात्र केवळ दोनच वर्षात जव्हार नगरपरिषदेवर बहुमताने निवडून आलेल्या व सत्तेत असलेल्यांना असे कोणते ग्रहण लागले की त्यांना बंडाचे निशाण फडकावे लागले हे सांगण्याचे टाळतात. तर जिल्हाध्यक्ष हा अंतर्गत वाद असून त्याचे राजकीय भांडवल कोणी करून असे जिल्हाध्यक्ष सांगत आहेत. दारूण पराभवामुळे आधीच खचलेल्या राष्ट्रवादी पक्षाला बसलेला हा राजकीय भूकंप हा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करीत असून नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांची मात्र फरपट होताना दिसत आहे. जव्हारच्या या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आ. आनंदभाई ठाकूर यांनी दि. २२ रोजी जव्हारला भेट दिली. परंतु यावेळी त्यांनी आम्हाला साधे चर्चेलाही बोलविले नाही असे नाराज गटाचे म्हणणे आहे. ठाकूर यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांशी काय चर्चा केली? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीच्या नाराज गटात जर फूट पडली व त्यातील काही नगरसेवकांनी काही अटी, शर्ती घालून पुन्हा सत्तेत येण्याचे ठरविले तर मात्र बंडखोरांचे नेतृत्व करणाऱ्यांची गोची होणार असून त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी होवू शकते. शिवसेनेचे दोन व काँग्रेसचा एक असे तीन विरोधी नगरसेवक मात्र सर्व राष्ट्रवादीच्या या गटबाजावर बारीक लक्ष ठेवून आहेत. सायंकाळपर्यंत मात्र राष्ट्रवादीच्या काही मोठ्या नेत्यांनी नाराज गटाची भेट घेवून त्यांचे मने वळविण्याचा प्रयत्न केला.