नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई शहरातील ८ विभागांपैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. दिघा, ऐरोली व घणसोली विभागांमध्ये युतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे दोन प्रभाग समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यातून जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून एक ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँगे्रसचे एकहाती वर्चस्व असल्यामुळे आतापर्यंत सत्तेची सर्व पदे त्यांच्याच ताब्यात होती. गत दहा वर्षांत एक वेळ नेरूळचा अपवाद वगळता सहाही प्रभाग समित्या त्यांच्याच ताब्यात राहिल्या आहेत. परंतु यावेळी मात्र राष्ट्रवादीला किमान दोन प्रभाग समित्यांवर पाणी सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिघामध्ये युतीचे पाच सदस्य असून राष्ट्रवादीचे चार सदस्य आहेत. ऐरोलीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक ९ नगरसेवक निवडून आले आहेत. यामुळे ऐरोली दिघा प्रभाग समिती शिवसेनेकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. घणसोलीमध्येही शिवसेनेचे पारडे जड आहे. बंडखोरी व तिकीट वाटपात झालेल्या चुकांमुळे राष्ट्रवादीची पिछेहाट झाली आहे. एक उमेदवाराचा अर्ज छाननीमध्येच बाद झाल्यामुळे लढण्यापूर्वीच राष्ट्रवादीला हार पत्करावी लागली होती. वाशी - तुर्भेमध्ये राष्ट्रवादी काँगे्रस व सर्व विरोधकांचे सदस्य समान आहेत. यामुळे काँगे्रसला सोबत घेतले तरच या ठिकाणी प्रभाग समिती ताब्यात राहू शकते, अशी परिस्थिती आहे. कोपरखैरणे, नेरूळ व सीबीडीमध्ये मात्र राष्ट्रवादीला निर्विवाद वर्चस्व मिळाले आहे. या तीन विभागांसह तुर्भेमुळेच राष्ट्रवादीला सत्तेपर्यंत जाता आले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला सर्वात मोठा फटका बसला. गणेश नाईक यांनाही पराभवास सामोरे जावे लागले. परंतु याच मतदारसंघाने महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरसेवक मिळवून दिले आहेत. विभागवार संख्याबळावरून आता नेत्यांच्या प्रभावाचीही चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत. पक्ष सोडून शिवसेनेत गेलेल्या ९ पैकी एकाही पदाधिकाऱ्याचा पराभव त्यांना करता आलेला नाही. सेनेने निवडणुकीमध्ये विजय चौगुले यांना डावलले परंतु त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. बेलापूर मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनाही प्रभाव पाडता आलेला नाही. राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा संजीव नाईक यांनी सांभाळली होती. त्यांनी पक्षाला चांगले यश मिळवून दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. विभागवार पक्षीय कामगिरी पुढीलप्रमाणे - विभागराष्ट्रवादीशिवसेनाकाँगे्रसभाजपाअपक्षदिघा४४०१०ऐरोली३९३०१घणसोली३५०११कोपरखैरणे १०६००१वाशी५२३१०तुर्भे८४२१०नेरूळ१०६१११सीबीडी८२११०
पाच विभागांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर
By admin | Updated: April 26, 2015 00:00 IST