कर्जत : तालुक्यातील 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक झालेल्या वाकस, तिवरे आणि वरई तर्फेनीड या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी निवडणुका झाल्या. त्यात अपेक्षेप्रमाणे तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने वर्चस्व प्रस्थापित करून सरपंचपदे मिळविली. त्यात वाकस, तिवरे आणि वरईतर्फे नीड येथील सरपंचपदांचा समावेश आहे. वाकस येथील सर्वसाधारण महिला राखीव सरपंचपदासाठी पिठासीन अधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. सरपंचपदासाठी अनुराधा बबन धुळे आणि उपसरपंचपदासाठी भाऊ दुर्गे यांचे एकमेव अर्ज निर्धारित वेळेत दाखल झाल्याने सभेमध्ये पिठासीन अधिकारी पाटील यांनी सरपंचपदी अनुराधा धुळे, तर उपसरपंचपदी भाऊ दुर्गे यांची बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. वरईतर्फेनीड या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव सरपंचपदाच्या निवडीसाठी पिठासीन अधिकारी जी. टी. उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी सरपंचपदासाठी यशोदा मोडक यांनी तर उपसरपंच पदासाठी जितेंद्र्र देशमुख यांचे अर्ज दाखल केले होते. विशेष सभेमध्य पिठासीन अधिकारी उबाळे यांनी दोघांची निवड केली. तालुक्यातील तिवरे पंचायतीत पिठासीन अधिकारी नवाळे यांच्याकडे सरपंचपदासाठी राष्ट्रवादीच्या बारकी वाघमारे, तर उपसरपंच पदासाठी जगदीश ठाकरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच आणि उपसरपंचांची बिनविरोध निवड केली. (वार्ताहर)
सरपंचपदी राष्ट्रवादीचे वर्चस्व
By admin | Updated: December 15, 2014 22:36 IST