मुंबई : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा करू असे सांगून किचकट निकष लावत कर्जमाफी केली. अजून एकाही शेतक-याची कर्जमाफी झालेली नाही. या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे १ आॅक्टोबर पासून राज्यव्यापी आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.८९ लाखांपैकी अर्ध्या लोकांचेही आॅनलाईन फॉर्म भरलेले नाहीत. मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकरी आत्महत्या करत आहेत. इतकी वाईट परिस्थिती शेतकºयांवर आल्याचे मलिक म्हणाले.
कर्जमाफी विरोधात राष्ट्रवादीचा १ आॅक्टोबर पासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 05:15 IST