Join us

नयानगर पोलीस ठाणे ‘चौकीत’

By admin | Updated: May 6, 2015 01:35 IST

वासिंद, नालासोपाऱ्याच्या तुळिंजसह मीरा रोडच्या नयानगरकरिता स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर केल्यानंतरही नयानगर पोलीस ठाण्यासाठी अद्याप सोयीची जागा मिळालेली नाही.

भार्इंदर : वासिंद, नालासोपाऱ्याच्या तुळिंजसह मीरा रोडच्या नयानगरकरिता स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर केल्यानंतरही नयानगर पोलीस ठाण्यासाठी अद्याप सोयीची जागा मिळालेली नाही. हे पोलिस ठाणे सध्या एका चौकीत सुरू करण्यात आले आहे. नयानगर नवीन पोलीस ठाण्याला २०१४ मध्ये गृहविभागाची परवानगी मिळाली. यासाठी मीरा रोड येथील रसाझ मॉल परिसरात पोलीस ठाण्याचे आरक्षण होते. या जागेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे २१ हजार ५०० चौरस फूट इतके असल्याने येथे विभागीय कार्यालयासह पोलीस ठाणे, विश्रामगृह प्रस्तावित होते. परंतु, तत्कालीन पोलीस अधीक्षक मधुकर पांडे यांनी रसाझ मॉलच्या मालकाला झुकते माप देत आरक्षणापैकी केवळ २० टक्के जागेत पोलीस ठाणे बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने आता जेमतेम साडेचार हजार चौ.फूट जागाच शिल्लक आहे. कामाचा व्याप...नयानगर पोलीस ठाण्यांतर्गत स्व. इंदिरा गांधी उड्डाणपूल व छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या उजव्या बाजूपासून सिल्व्हर पार्कपर्यंतचा भाग, पुढे सिल्व्हर पार्क ते सृष्टीपर्यंतचा उजवीकडील भाग, शांतीनगर, नयानगर, शांती पार्क, शीतलनगर, साईबाबानगर, पूनमसागर कॉम्प्लेक्स आदीं परिसराचा समावेश आहे.पालिकेकडे अनेकदा जागेची मागणी केली असता त्याला प्रतिसाद न मिळाल्याने तात्पुरत्या स्वरुपात नयानगर चौकीत पोलिस ठाणे सुरु करण्याची तयारी करुन ठेवण्यात आली आहे. त्याची अतिरीक्त सोय शांतीनगर चौकीत करण्यात आली आहे. तीे सुरु करण्यासाठी वरीष्ठांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. - धनाजी क्षीरसागर, वरीष्ठ पो.नि. मीरारोड