Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिकांनी आधी राष्ट्रवादीची दुर्दशा पाहावी - विजय कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 05:44 IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते सध्या तुरुंगात आहेत तर काही जण त्या वाटेवर आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते सध्या तुरुंगात आहेत तर काही जण त्या वाटेवर आहेत. शिवाय, राज्यभर या पक्षाची पिछाडी सुरूच आहे. त्यामुळे विनाकारण चर्चेत राहण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्ते नवाब मलिक यांनी अन्य नेत्यांचे राजीनामे मागण्याआधी स्वपक्षाच्या दुर्दशेची काळजी घ्यावी, असा टोला भाजपाचे विजय कांबळे यांनी लगावला.मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नावर विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी अलीकडेच केली होती. यावर कांबळे म्हणाले की, राजकीय हेतूने ही मागणी होत आहे. स्वत:चे अस्तित्व दाखविण्याची नवाब मलिकांची ही केवलवाणी धडपड आहे. स्वत: गृहनिर्माण मंत्री असताना मलिक यांनी काय दिवे लावले आणि काय घपले केले हे सर्वश्रुत आहे. आधी आपल्या बुडाखाली काय जळते आहे ते पाहावे, गेलेली नैतिकता परत मिळवावी आणि त्यानंतरच मलिकांनी इतरांचा राजीनामा मागावा, असे कांबळे म्हणाले.