Join us  

नवरात्रौत्सवाला मिळणार आॅनलाइन परवानगी; महापालिकेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 3:30 AM

गणेशोत्सवाप्रमाणे आता नवरात्रौत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगीही आॅनलाइन देण्यात येत आहे. त्यानुसार अर्ज करण्यासाठी मंडळांना ९ आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

 मुंबई : गणेशोत्सवाप्रमाणे आता नवरात्रौत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगीही आॅनलाइन देण्यात येत आहे. त्यानुसार अर्ज करण्यासाठी मंडळांना ९ आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मंडपांनाही उच्च न्यायालयाच्या नियमानुसारच परवानगी मिळणार आहे. त्यामुळे नियमात न बसणाऱ्या काही मंडळांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे.सण-उत्सवांसाठी उभारण्यात येणाºया मंडपांना या वर्षीपासून आॅनलाइन परवानगी देण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या अटींनुसार अग्निशमन नियम, पदपथ पादचाºयांना मोकळे ठेवणे, वाहतुकीस अडथळा होऊ न देणे या अटी पाळणाºयांना परवानगी देण्यात येते. गणेशोत्सवादरम्यान महापालिकेने अर्ज फेटाळल्यानंतरही २८१ मंडळांनी अनधिकृतपणे मंडप उभारले होते. त्यामुळे नवरात्रौत्सवात बेकायदा मंडप उभे राहू नयेत, याची खबरदारी घेण्याची ताकीद पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अधिकाºयांना दिली आहे.पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर डेंग्यूचा आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने डेंग्यू तसेच साथीच्या आजारांबाबत दांडिया खेळण्यास आलेल्या लोकांचे प्रबोधन करण्याची आयोजकांना सूचना करण्यात येणार आहे. तसेच प्रबोधनात्मक पोस्टर्स लावणे, मंडळांना प्रबोधनात्मक ध्वनिफिती व चित्रफितींचे वाटप करून त्याचा नियमित उपयोग करण्याची विनंती नवरात्रौत्सव मंडळांना करण्यात येणार आहे.नवरात्रौत्सवाच्या काळात दांडिया व गरबा खेळण्यासाठी मुंबईतील अनेक मंडळांत गर्दी होत असते. अशावेळी आजूबाजूला अन्नपदार्थांचे स्टॉल्स सुरू होतात. मात्र उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे आजार पसरण्याची शक्यता असल्याने असे अन्नपदार्थ, पेय पदार्थ, निकृष्ट दर्जाचा बर्फ यावर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.खबरदारी घेण्याची ताकीदगणेशोत्सवादरम्यान महापालिकेने अर्ज फेटाळल्यानंतरही २८१ मंडळांनी अनधिकृतपणे मंडप उभारले होते. त्यामुळे नवरात्रौत्सवात बेकायदा मंडप उभे राहू नयेत, याची खबरदारी घेण्याची ताकीद पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अधिकाºयांना दिली आहे.नवरात्रौत्सवाच्या काळात दांडिया व गरबा खेळण्यासाठी मुंबईतील अनेक मंडळांत गर्दी होत असते. उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे आजार पसरण्याची शक्यता असल्याने असे अन्नपदार्थ, पेय पदार्थ, निकृष्ट दर्जाचा बर्फ यावर कारवाई करण्याची मोहीम सुरू करणार आहे़

टॅग्स :मुंबई महानगरपालिका