Join us

नवी मुंबईचे एसीपी किरण पाटील यांची मुंबईत बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 05:07 IST

नवी मुंबई पोलीसदलातील सहायक आयुक्त किरण पाटील यांची नुकतीच मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

मुंबई : नवी मुंबई पोलीसदलातील सहायक आयुक्त किरण पाटील यांची नुकतीच मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. पोलिसांच्या अस्थापना विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनीएका पत्रकाद्वारे बदलीचे आदेश काढले आहेत. या बदलीमुळे मुंबई पोलीस दलाला आणखी एक चांगला अधिकारी मिळाला आहे. शुक्रवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.