नवी मुंबई : महावितरण कंपनीच्या वाशी आणि पनवेल कार्यालयांच्या अखत्यारीत येणा:या केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि पनवेल विभागातील काही भागांचा वीजपुरवठा उद्या
(शुक्रवारी) खंडित करण्यात येणार आहे.
या कामामुळे वाशी विभागांतर्गत दाणा मार्केट, ग्रेन मार्के ट, मॅफको कोल्ड स्टोअरेज, तुभ्रे गाव, मिनी मार्केट, रबाळे एमआयडीसी, आंबेडकर नगर, साईबाबा नगर, गौतम नगर, पावणो गाव, पावणो, ऐरोली आणि दिघा एमआयडीसी आदी परिसरांचा वीज पुरवठा सकाळी 1क् ते सायंकाळी 5 वाजेपर्यत बंद राहणार आहे. त्याचबरोबर पनवेल विभागात येणा:या तळोजा एमआयडीसी, खारघर, मुर्बी, पापडीपाडा, इनामपुरी, ओवा, आवेकॅम्प, घोलवाडी, पेठ, रांजणपाडा, फरशीपाडा आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी 9 ते दुपारी 2 र्पयत बंद करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)