Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवघर पोलिसांची सोमय्यांना नोटीस

By admin | Updated: September 19, 2014 01:56 IST

खासदार किरीट सोमय्या यांनी 21 ऑगस्ट रोजी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात संपत मुंढे या पोलीस निरीक्षकाला मारहाण केली, धमकी दिली.

मुंबई  : खासदार किरीट सोमय्या यांनी 21 ऑगस्ट रोजी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात संपत मुंढे या पोलीस निरीक्षकाला मारहाण केली, धमकी दिली. या प्रकरणी नवघर पोलिसांनी 24 ऑगस्ट रोजी सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काल पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली व पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले. पोलीस त्यांचा जबाब नोंदवून घेणार होते. मात्र ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा नोटीस पाठवून त्यांना बोलावले जाईल, अशी माहिती सहायक आयुक्त आव्हाड यांनी दिली. (प्रतिनिधी)