Join us

नव्वदीपार गुण मिळूनही प्रवेशाची वाट खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 03:03 IST

अल्पसंख्याक कोट्याचा गोंधळ; पसंतीचे महाविद्यालय मिळणे अवघड

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अल्पसंख्याकांच्या जागा महाविद्यालयाला परत करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. मात्र याचा थेट परिणाम महाविद्यालयाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीवर दिसून आला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अल्पसंख्याकांना थेट प्रवेशाची संधी निर्माण झाली असली तरी इतर नव्वदीपार असलेल्या विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नव्वदीपार गुण असूनही आम्हाला नामांकित किंवा पसंतीचे महाविद्यालय मिळत नसेल तर आमच्या मेहनतीचा फायदा काय? अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.गुरुवारी जाहीर झालेल्या दुसºया गुणवत्ता यादीमध्ये अनेक महाविद्यालयांच्या जागा भरल्यामुळे आणि अल्पसंख्याक जागांवर केवळ तेच प्रवेश होऊ शकणार असल्याने नव्वदीपार गुण मिळविलेले अनेक विद्यार्थीही प्रवेशाला मुकल्याचे दिसून आले.या विद्यार्थ्यांना आता त्यांचा पसंतीक्रम बदलून पुन्हा थेट तिसºया गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे. दुसºया यादीत नाव न लागल्याने विद्यार्थी व पालकांनी गुरुवारी उपसंचालक कार्यालयासमोर रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या.दुसºया प्रवेशाच्या यादीसाठी जागा असल्याने विद्यार्थ्यांनी नामांकित अल्पसंख्याक महाविद्यालयांतही अर्ज भरले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या अचानक रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांचे नाव यादीत आलेच नाही. त्यामुळे आम्हाला गुणवत्ता असूनही प्रवेश का नाही, असा सवाल संतप्त विद्यार्थी आणि पालक तेथे विचारत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

टॅग्स :महाविद्यालयमुंबई