Join us

गोएंकांच्या बुद्ध अस्थींच्या संकल्पाला नवसंजीवनी

By admin | Updated: August 24, 2014 01:32 IST

गेली 35 वर्षे प्रयत्न करणारे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आता विपश्यना सेवक संघाने पुढाकार घेतला आह़े

अमर मोहिते - मुंबई
भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थी दिल्ली येथील म्युङिायममध्ये न ठेवता विपश्यना साधना चालणा:या  पॅगोडामध्ये ठेवाव्यात, यासाठी गेली 35 वर्षे प्रयत्न करणारे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आता विपश्यना सेवक संघाने पुढाकार घेतला आह़े 
यासाठी या संघाने वरळी येथील आंबेडकर भवनमध्ये येत्या रविवारी एका भव्य सभेचे आयोजन केले आह़े या सभेत बौद्ध भिक्षु ज्ञानज्योती भंते, विपश्यना आचार्य दिंगबर धांडे, साहाय्यक आचार्य गौतम गायकवाड व इतर मान्यवर याबाबत मार्गदर्शन करणार आहेत़ या सभेतच केंद्र सरकारकडून बुद्ध अस्थी मिळवण्यासंदर्भातील संघाची पुढील रूपरेषाही ठरणार आह़े
भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थी देशातील विविध ठिकाणी ठेवण्यात आल्या़ ब्रिटिशांनी भारत सोडताना त्यांना सापडलेल्या काही बुद्ध अस्थी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपुर्द केल्या़  त्यानंतर या बुद्ध अस्थी दिल्लीतील म्युङिायममध्ये ठेवण्यात आल्या़ यांचा संपूर्ण ताबा केंद्र सरकारकडे आह़े
 मात्र या अस्थींचे खरे स्थान म्युङिायममध्ये नसून भगवान बुद्धांच्या विपश्यनेचा अभ्यास चालणा:या पॅगोडामध्ये आह़े़ कारण म्युङिायममध्ये नागरिक चप्पल घालून बुद्ध अस्थी बघतात़ हे गैर असून विपश्यना साधनेचा अभ्यास चालणा:या पॅगोडातच बुद्ध अस्थी ठेवल्या गेल्या पाहिजेत, असे गोएंका सांगत असत व या अस्थी केंद्र सरकारकडून मिळवून त्या पॅगोडामध्ये ठेवण्यासाठी गोएंका यांनी 35 वर्षे प्रयत्न केल़े
अखेर गेल्यावर्षी गोएंका यांचे महापरिनिर्वाण झाल़े त्यामुळे गोएंका यांचा हा संकल्प कोण पूर्ण करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता़
पण आता गोएंका यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते असताना स्थापन झालेला विपश्यना सेवक संघ प्रयत्न करणार आह़े तसा दावाच या संघाने केला आहे व याची आखणी करण्यासाठीच वरळी येथे भव्य सभेचे आयोजन केले असल्याचे विपश्यना साहाय्यक आचार्य गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े
 
च्विपश्यनाचार्य गोएंका यांनी गौतम बुद्धांच्या विपश्यना विद्येचा प्रचार व प्रसार संपूर्ण जगभरात केला़ बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर ही विद्या भारतातून नष्ट झाली़ ब्रम्हदेशात ही विद्या गुरू-शिष्य परंपरेने जिवंत राहिली़
च्विपश्यनाचार्य सयाजी उ बा खीन यांच्याकडून ही विद्या शिकल्यानंतर गोएंका यांनी भारतासह जगभरात याची शेकडो अभ्यास केंद्रे उभी केली़ याचाच भाग म्हणजे मुंबईतील गोराई येथे एक भव्य पॅगोडा गोएंका यांनी उभारला़
 
च्बुद्ध अस्थींचे महत्त्व पटवून सांगणारी गोएंका यांची विशेष मुलाखत ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसारित केली होती़ तसेच गोएंका यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे बुद्ध अस्थी मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याचे वृत्तही ‘लोकमत’ने दिले होत़े त्यामुळे आता सेवक संघाला तरी गोएंका यांचा संकल्प पूर्ण करण्यात यश मिळेल का, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आह़े