Join us

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे संविधान वाचवा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 05:07 IST

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या अभियानातंर्गत २० जून रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या अभियानातंर्गत २० जून रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.राज्याच्या विविध भागात हे संविधान वाचवा अभियान घेतले जाणार आहे. २० जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस टी.पी.पितांबरन मास्टर, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार प्रफुल्ल पटेल, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार , राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, खासदार माजिद मेमन, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदींसह प्रमुख नेते, खासदार, आमदार व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.