पेण : भारताचा ६६ वा प्रजासत्ताक दिन पेणमध्ये उत्साहात झाला. पेणचे मुख्यालय असलेल्या पेण तहसील कार्यालयात सकाळी उपजिल्हाधिकारी विश्ननाथ वेटकुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तर पेण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी, पेण उपविभागीय पोलीस कार्यक्रमात डीवायएसपी प्रशांत देशपांडे तर पेण नगरपरिषद नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. एकंदर पेण शहरातील महात्मा गांधी ग्रंथालय, पेण पंचायत समिती, पेण आरटीओ, पेण बसस्थानक, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी त्या त्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.> पेणच्या २२२ प्राथमिक शाळा, १७ केंद्रशाळा, ३९ माध्यमिक हायस्कूल, २१ सहकारी भात गिरण्या, रेल्वे स्थानक, रामवाडी बसस्थानक, वडखळ व दादर सागरी पोलीस ठाणे, सहकारी बँका व ६३ ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. > सकाळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या प्रभातफेऱ्या, बँडपथक व स्वच्छ गाव, सुंदर गाव या स्वच्छता अभियानाशी निगडित घोषणांनी परिसर दुमदुमला. प्रजासत्ताक चिरायू होवो, जय जवान, जय किसान या घोषणा ऐकायला मिळत होत्या.> प्रत्येक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण झाले. पेणच्या गुरुकुल शाळेत शालेय कवायती, खेळातून राष्ट्रीय एकतेचे दर्शन, गाणी, परेड व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शिशुविकास मंदिर, सुमतीदेव विद्यालय आदी शाळांत रंगतदार कार्यक्रम झाले.
खेळातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
By admin | Updated: January 27, 2015 22:41 IST