विशाल हळदे, ठाणेदररोज लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडविणाऱ्या एसटीच्या वाहक आणि चालकांच्या नशिबी मात्र खोपट स्थानकातील नरकपुरीत निवास करण्याचे दुर्भाग्य आले आहे. मुळात ही निवासाची सोय ओपन डॉर्मेटरी स्वरुपाची आहे. तिथे स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. तेथील कोपऱ्यांचा वापर स्वच्छतागृहासारखा होतो. त्याची सफाई देखील होत नाही. त्यामुळे धूळ, घाण याचे साम्राज्य तिथे आहे. पान, गुटख्याच्या पिचकाऱ्या, सिगरेटची थोटके, गुटख्याचे पाऊच, खरकटे यामुळे डास आणि चिलटांचा सुळसुळाट आहे. पाण्याच्या आणि मद्याच्या रिकाम्या बाटल्या याचेही खच पडले आहेत. येथे डास मच्छरांचा आणि दुर्गंधीचा एवढा त्रास आहे की अनेक जण बसच्या टपावर झोपतात.
एसटी चालक-वाहक निवासात नरकपुरी
By admin | Updated: May 14, 2015 00:10 IST