Join us

‘नरेंद्र मोदींचे फलक काढा’

By admin | Updated: January 10, 2017 04:57 IST

राज्यातील विविध भागांत विधान परिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने राजकीय पक्षांचे

मुंबई : राज्यातील विविध भागांत विधान परिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे फलक काढण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांच्या फलकांप्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपांवर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक व इतर सरकारी जाहिराती तत्काळ हटवाव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आचारसंहिता लागू असणाऱ्या भागातील पंतप्रधान मोदी आणि सरकारच्या जाहिराती हटवावाव्यात यासाठी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)