Join us

स्टिंग आॅपरेशनमध्ये नानावटी रुग्णालय दोषी, पाच लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 04:18 IST

मुंबई : गरीब रुग्णांवरील उपचारांसंबंधी करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालय दोषी आढळले आहे. यासंदर्भात धर्मादाय आयुक्तालयाने रुग्णालयाच्या विश्वस्तांना पाच लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीस स्वत:च्या खिशातून देण्याचा आदेश नुकताच दिला आहे. हा दंड भरण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.धर्मादाय आयुक्तालयाचे आयुक्त, सहकाºयांनी नानावटी रुग्णालयात वेशांतर करून स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यात रुग्णालय दोषी आढळले. धर्मादाय आयुक्तालयाने नानावटी रुग्णालयाला रीतसर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले. दंडाची रक्कम रुग्णालय न्यासाच्या खात्यातून न भरण्याचा आदेश आहे.धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या रुग्णालयाच्या क्षमतेच्या १० टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. भविष्यात याची पायमल्ली करणाºया रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती धर्मादाय आयुक्तालयाचे आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल