- मनोहर कुंभेजकरमुंबई - मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आणि लेखक गंगाराम गवाणकर यांच्या नुकतेच निधन झाले, त्यामुळे सांस्कृतिक आणि नाट्यक्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृती जतन राहाव्यात आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या हेतूने बोरिवली (पश्चिम) येथील आर-मध्य विभागातील द्वार्केश पार्क जवळ नव्याने विकसित नाट्यगृहाला “दिवंगत नाटककार गंगाराम गवाणकर नाट्यगृह” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
गवाणकर यांनी कोकणी-मालवणी संस्कृतीचा सुगंध असलेल्या नाटकांतून सामान्य माणसाचे वास्तव आणि संवेदना प्रभावीपणे मांडल्या. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ दिले आणि दहिसर-बोरिवली परिसरातील मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली.
शेट्टी यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की,गवाणकर यांनी कोकणी-मालवणी संस्कृतीचा सुगंध असलेल्या नाटकांतून सामान्य माणसाचे वास्तव आणि संवेदना प्रभावीपणे मांडल्या. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ दिले आणि दहिसर-बोरिवली परिसरातील मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली.
त्यांचे या क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. त्यांच्या नावाने नाट्यगृहाचे नामकरण हे त्यांना साजेसे आदरांजली ठरेल.या प्रस्तावाला उत्तर मुंबईतील स्थानिक सांस्कृतिक संस्था व नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असंल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
Web Summary : Gopal Shetty urges Mumbai authorities to name Kandivali's new theater after late playwright Gangaram Gavankar. Gavankar championed Konkani-Malvani culture, mentored artists, and revitalized Dahisar-Borivali's theater scene. This naming honors his invaluable contribution.
Web Summary : गोपाल शेट्टी ने मुंबई के अधिकारियों से कांदिवली के नए थिएटर का नाम दिवंगत नाटककार गंगाराम गवाणकर के नाम पर रखने का आग्रह किया। गवाणकर ने कोंकणी-मालवणी संस्कृति का समर्थन किया, कलाकारों का मार्गदर्शन किया और दहिसर-बोरिवली के थिएटर को पुनर्जीवित किया। यह नामकरण उनके अमूल्य योगदान का सम्मान है।