Join us

कर्जाच्या नावाखाली घाटकोपरमधील व्यावसायिकाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 06:11 IST

कर्जाच्या नावाखाली घाटकोपरमधील व्यावसायिक जगन्नाथन राजू यांना ७२ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे.

मुंबई : कर्जाच्या नावाखाली घाटकोपरमधील व्यावसायिक जगन्नाथन राजू यांना ७२ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.कर्ज देण्याच्या नावाखाली राजू यांना त्यांच्याच ओळखीच्या एकाने फसवले. त्यांच्याकडून ७२ लाख रुपये घेतल्यानंतर पोबारा केला. या प्रकरणी त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.