Join us
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या रोगाची दक्षता घेऊन पालिकेची नालेसफाई

By admin | Updated: December 19, 2014 00:05 IST

मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू या साथीच्या रोगासंबंधी उपाययोजना म्हणून खोपोली नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गटारे,

वावोशी : मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू या साथीच्या रोगासंबंधी उपाययोजना म्हणून खोपोली नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गटारे, नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. यात १८ कर्मचारी कार्यरत आहेत. ही मोहीम एक महिना हाती घेतल्याची माहिती आरोग्य अधिकारी सोनवणे यांनी दिली.गेल्या आठ दिवसांपासून पालिका आरोग्य विभागाने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. ठेकापध्दतीवर काम करणारे १८ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. राज्यात डेंग्यूचे अनेक बळी गेल्याने शासकीय यंत्रणा गेल्या दोन महिन्यांपासून खडबडून जागी झाली आहे. जिल्हा यंत्रणेकडून कर्जत येथे याबाबत दक्ष राहण्याचे आदेश दिल्याने पालिकेने खबरदारीची उपाययोजना घेतली. (वार्ताहर)