Join us

नालेसफाईसाठी कंत्राटदारांना तंबी!

By admin | Updated: May 14, 2014 23:23 IST

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाईच्या कामासंबधी कंत्राटदाराकडून कोणत्याही प्रकाराची दिरंगाई झाली तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल; असा सज्जड दमच महापालिकेने कंत्राटदारांना भरत तंबी दिली आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाईच्या कामासंबधी कंत्राटदाराकडून कोणत्याही प्रकाराची दिरंगाई झाली तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल; असा सज्जड दमच महापालिकेने कंत्राटदारांना भरत तंबी दिली आहे.ऐन पावसाळ्यात नाले तुंबून मुंबईकरांच्या रोषाला जाऊ लागू नये म्हणून महापालिका प्रशासन चांगलेच खडबडून जागे झाले आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने नालेसफाईची कामे १ एप्रिलपासून हाती घेतली आहेत. सद्यस्थितीमध्ये नालेसफाईची ६० टक्के कामे झाल्याचा दावाही महापालिका प्रशासनाने केला आहे.महापौर सुनील प्रभू यांनी यासंदर्भात सांगितले की, १ एप्रिलपासूनच संपुर्ण मुंबईतील नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. आता पर्यंत ६० टक्के नालेसफाईची कामे पुर्ण झाली आहेत. नालेसफाईदरम्यान काढलेला गाळ त्वरित उचलण्याचे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात येत आहे.अतिरिक्त आयुक्त एस.व्ही. श्रीनिवास यांनी सांगितले, मुदतीपूर्वी सर्व नाल्यांच्या सफाईची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. सध्या नालेसफाईची कामे ६० टक्क्यांपेक्षा अधिक पुर्ण झाली आहेत. मे अखेरपर्यंत संपुर्ण शहरातील नालेसफाईची कामे पुर्ण होतील.दरम्यान, लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन व क्लिव्हलॅण्ड बंदर नाला या दोन ठिकाणच्या पम्पिंग स्टेशनचे काम सुरु असून, ते ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात पुर्ण होईल, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी).........................अशी झाली पाहणीमहापौर सुनील प्रभू यांनी बुधवारी नालेसफाईची पाहणी केली. वरळी येथील ल्व्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन, क्लिव्हलॅण्ड बंदर नाला पम्पिंग स्टेशन, फितवाला लेन, सेनापती बापट मार्गावरील कमानी गटाराचे मजबुतीकरण, दादर-धारावी मुखपथ, माहीम येथील निसर्ग उद्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस नाला, कुर्ला कारशेड, मुलुंड नानीपाडा, पवई मिठी नदी डॉ. आंबेडकर उद्यानाच्या समोरील नाला, सहार विमानतळाशेजारील लेलेवाडी नाला, एम.टी.एम.एन पूल, दहिसर नदी, कांदरपाडा फ्लायओव्हर पूल, पोईसर नदी, मीठ चौकी, लिंक रोड, पोईर नदी, मिलेटरी भाग, ठाकूर प्लॉट, बोरीवली येथील चंदावरकर नाला येथील नाल्याच्या सफाईची पाहणी करण्यात आली.