रोहा : दरवर्षी मान्सूनपूर्व नाले सफाई पावसाच्या तोंडावर सुरु केली जाते. त्यामुळे अतिवृष्टीमुळेच नाल्यातील गाळ व घनकचरा वाहून जातो. यंदा पालिकेच्या मुख्याधिकार्यांच्या सतर्कतेला शहरातील जागृत नागरिकांची साथ लाभल्याने नाले सफाईच्या कामात लाटले जाणारे रोहा नगर पालिकेचे आणि टॅक्सपेयर रोहेकर नागरिकांचे लाखो रुपये वाचणार आहेत. या व्यतिरिक्त पालिकेचा मान्सुन पूर्व कामाचे बजेट अर्ध्याहून कमी होणार आहे. यंदाही नेहमीप्रमाणे उशिराने पावसाची पहिली हजेरी लागली त्या मंगळवारच्या दिनी नाले सफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली. शहरात सर्वत्र साचलेला घनकचरा, सफाईच्या या कामात असलेल्या दर्जाचा अभाव, पावसाच्या मुसळधारेची वाट पहात मंद गतीने हे काम करण्याकडे असलेला ठेकेदाराचा कल आणि उपसलेला गाळ शहरापासून दूर ४ कि.मी. अंतरावर टाकणे बंधनकारक असताना तो शहरातच टाकला जात असल्याचे लक्षात आल्याने शहरातील एका ठेकेदाराकडून नगर पालिकेची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
नालेसफाईतील कचरा नाल्याबाहेरच
By admin | Updated: June 2, 2014 04:38 IST