मुंबई : भारतीय सेवा नाका कामगार संघटनेच्यावतीने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या जनजागृती अभियानाचा ३ जानेवारीला मुंबईत समारोप होणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणाऱ्या मेळाव्यासाठी राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती संघटक अॅड. नरेश राठोड व भास्कर राठोड यांनी दिली.
नाका कामगारांच्या प्रलंबित मागण्या, त्यांच्या समस्याची निरागत व्हावी, यासाठी राज्यभरात मेळावे घेवून समाजाला संघटीत केले जात आहे. राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमत्य ३ जानेवारीला अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे. त्यामध्ये उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, प्राचार्य मधुसिंग जाधव, सुभाष तंवर, मंगल चव्हाण, रामराम महाराज भाटेगावकर, राकेश जाधव, उल्हास राठोड आदी उपस्थित असणार आहेत.