Join us  

नायगाव स्थानक पोलिसांना व नागरिकांनाही सोईचे; फेऱ्या वाढविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 1:24 AM

मोनो रेल्वेच्या नायगाव स्थानकाचा लाभ येथील नागरिकांना व पोलिसांना होईल. 

- अमर मोहितेमुंबई : मोनो रेल्वेच्या नायगाव स्थानकाचा लाभ येथील नागरिकांना व पोलिसांना होईल. या स्थानकातून थेट वडाळा रेल्वे स्थानकाजवळ व सातरस्ता येथे जाणे अधिक सोईचे ठरते़ नायगाव येथून रस्ता मार्गे या दोन्ही ठिकाणी जाताना वेळ व पैसा दोन्ही खर्च होतात़ मोनोमुळे या दोन्हीची बचत होईल.नायगाव येथून वडाळा स्टेशनला जाण्यासाठी टॅक्सी भाडे किमान २२ रुपये होते़ या मार्गात लागणारे सिग्नल व वाहतूककोंडी यामुळे हा प्रवास १५ ते २० मिनिटांचा होतो़ बसचे तिकीट १० रुपये आहे़ बसलाही टॅक्सीप्रमाणे वेळ लागतो़ या मार्गावर बसची संख्या कमी आहे़ मोनोने हे अंतर ५ ते ८ मिनिटांत पूर्ण होते़ नायगाव ते वडाळा स्टेशनचे तिकीट १० रुपये आहे़ नायगावमधील नागरिकांना वाशी किंवा पनवेलला जाण्यासाठी लवकरात लवकर व कमी पैशात वडाळा स्टेशनला पोहोचता येते.नायगाव येथे पोलीस मुख्यालय आहे़ येथे येणारे बहुतांश पोलीस अधिकारी व कर्मचारी हार्बर मार्गावरील स्थानकांवरून येतात़ त्यांच्यासाठी मोनो नक्कीच सोईची आहे़ पोलिसांना बससेवा मोफत असल्याने ते प्रवास करणे टाळतात़ भविष्यात ही परिस्थिती बदलू शकते़ पोलीसही मोनोचा वापर करतील़ नायगावहून थेट चेंबूरलाही मोनोने जाणे साईचेच आहे़ अन्यथा दादर रेल्वे स्थानक, तेथून कुर्ला व तेथून हार्बरमार्गे चेंबूर गाठावे लागते.नायगाव येथून सातरस्ता येथे टॅक्सीने जाण्यासाठी किमान ५० ते ६० रुपये लागतात़ वाहतूककोंडीमुळे हे अंतर कापण्यासाठी किमान अर्धा तास लागतो़ मोनोचे प्रवास भाडे २० रुपये आहे़ मोनोने १२ ते १५ मिनिटांत हे अंतर पूर्ण होते़ सातरस्ता येथे कस्तुरबा रुग्णालय आहे़ काविळीवर उपचारासाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे़ नायगावहून या रुग्णालयात जाणे अधिक सोपे आहे़ मोनोने प्रवास करणे येथील नागरिकांनी हळूहळू सुरू केले आहे़ भविष्यात मोनोची प्रवासी संख्या नक्कीच वाढेल़ मात्र, मोनोच्या फेऱ्या वाढविल्या पाहिजेत़ तिकीट दर थोडे कमी करावेत, अशी मागणी येथील नागरिकांची आहे़ या मार्गावर फेºया वाढवाव्यात व तिकिटाचे दर कमी करावेत, अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे़ ही मागणी पूर्ण केल्यास प्रवासी संख्या नक्की वाढेल, असा विश्वासही येथील काही नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़‘आंबेडकरनगर’ भविष्यात सर्वात वर्दळीचे स्थानककेईएम, वाडिया, टाटा रुग्णालयजवळ असलेले एकमेव स्थानक म्हणजे आंबेडकरनगर आहे़ या तिन्ही रुग्णालयात हार्बर मार्गावरून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहेत़ वडाळा रेल्वे स्थानकात उतरून या रुग्णालयात येण्यासाठी मोनो अधिक सोयीची आहे़ अन्यथा वाशी किंवा पनवेल येथून या रुग्णालयांत येण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानकात येऊन तेथून परळ स्थानकात यावे लागते़ यात वेळ खर्च होतो़ गर्दीतून यावे लागते़ मोनोने मात्र थेट येणे शक्य आहे़ हळूहळू मोनोने या स्थानकावर येणाºयांची संख्या भविष्यात वाढेल़ याचा फायदा नक्कीच एमएमआरडीएला होईल. पण त्यासाठी थोडा कालावधी जावा लागेल.

टॅग्स :मोनो रेल्वेमुंबई