Join us

गायिकेच्या मृत्यूचे गूढ कायम; व्हिसेरा अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगावच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गाणे गाण्यासाठी आलेल्या गायिकेचा अचानक मृत्यू झाला होता. याप्रकरणी दिंडोशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगावच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गाणे गाण्यासाठी आलेल्या गायिकेचा अचानक मृत्यू झाला होता. याप्रकरणी दिंडोशी पोलीस चौकशी करत असून, व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठवून अंतिम शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

गोरेगावच्या नागरी निवारा परिसरात राहणाऱ्या गायिका शुभा मुखर्जी (५०) यांना एका व्यावसायिकाच्या लग्न सोहळ्यात अन्य गायक शैलेंद्र भारती यांनी सोबत गाणे गाण्यासाठी गोरेगावच्या वेस्ट इन या हॉटेलमध्ये बोलावले होते. त्यानुसार, त्या २९ नोव्हेंबर, २०२० रोजी तेथे गेल्या. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्या त्यांच्या खोलीत आराम करण्यासाठी गेल्या आणि काही वेळाने बाहेर आल्या. तेव्हा त्यांना बरे वाटत नव्हते आणि अचानक त्या खाली जमिनीवर कोसळल्या. भारती यांनी मुखर्जी यांना तातडीने संजीवनी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, आम्ही संबंधित महिलेचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविला असून, त्याच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहोत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांनी दिली.