Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुलींच्या पळण्यामागचे गूढ कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 02:36 IST

माटुंगा येथील श्रद्धानंद महिला आश्रमातून पळालेल्या तीन मुलींच्या पळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंबई : माटुंगा येथील श्रद्धानंद महिला आश्रमातून पळालेल्या तीन मुलींच्या पळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी माटुंगा पोलीस अधिक तपास करीत आहेत.गेल्या ९० वर्षांपासून ही संस्था अल्पवयीन मुलींसह तरुणींसाठी मोफत शिक्षण तसेच त्यांच्यासाठी आधार ठरत आहे. जवळपास १०० ते १५० मुली येथील वसतिगृहात राहतात.सर्व सुख-सुविधा मिळत असताना, डिसेंबर महिन्यात तीन मुलींनी पळ काढला. माटुंगा पोलिसांनी तिघींचाही शोध घेत, त्यांना डोंगरीच्या बालसुधारगृहात ठेवले आहे.या मुलींनी बाहेरील व्यक्तीच्या सांगण्यावरून पळ काढल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संस्थेच्या सीसीटीव्हीमध्येही त्या स्वत: भिंतीवरून उड्या मारून बाहेर गेल्याचे समोर आले होते.