Join us
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात टेम्पोच्या धडकेने मायलेकाचा मृत्यू

By admin | Updated: April 30, 2015 23:43 IST

शहरातील व्हिनस चौकातून दुपारी १ च्या सुमारास जाणाऱ्या माय लेकराला टेम्पो-मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

उल्हासनगर : शहरातील व्हिनस चौकातून दुपारी १ च्या सुमारास जाणाऱ्या माय लेकराला टेम्पो-मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. टेम्पोचालकाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोळस पुढील तपास करीत आहेत.उल्हासनगर कॅम्प नं.-४, व्हिनस चौकातून जया कटारिया-३४ व दीड वर्षाचा मयंक दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्या वेळी भरधाव येणाऱ्या टेम्पोने मोटारसायकलसह मायलेकाला जोरदार धडक दिल्याने मायलेक गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम जवळच्या खाजगी रुग्णालयासह शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित टेम्पोचालकाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकाराने परिसरात संतप्त प्रतिक्रिया उपटल्या असून शहरातील वाहतूककोंडीवर व रस्त्यात लावण्यात आलेल्या गाड्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे. विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)