Join us

फसवणूक प्रकरणी मायलेकींना अटक

By admin | Updated: July 11, 2014 00:00 IST

रहिवाशांची 1 कोटी 3क् लाख रूपयांची फसवणूक करून फरार झालेल्या मायलेकींना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.

पनवेल : चिटफंडच्या माध्यमातून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून तसेच बीएसटीमध्ये नोकरीला लावतो असे सांगून  बेरोजगार तरूणांची तसेच रहिवाशांची 1 कोटी 3क् लाख रूपयांची फसवणूक करून फरार झालेल्या मायलेकींना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. हा सर्व प्रकार मायलेकींनी अगदी संगनमताने जवळपास 2क्1क् पासून पनवेल परिसरात सुरू केल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांनी दिली. 
वैजयंती विजय हडकर (74, नवीन पनवेल) तसेच विशाखा मुकेश अरोरा (42, रा. चेंबूर )अशी आरोपींची नावे आहेत. या मायलेकींनी चिटफंडाच्या माध्यमातून पैसा दुप्पट करून देतो असे सांगून 1 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खांदेश्वर परिसरात उघड झाला आहे. विशाखा चेंबूर येथून येऊन नवीन पनवेल परिसरात चिटफंड चालवत असे. 
सुरूवातीला चिटफंड चालवताना मिळेल त्या रकमा एक दुस:या सभासदाला दुपटीच्या स्वरूपात देऊन या मायलेकींनी  पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर, कळंबोली, सुकापूर, कामोठे परिसरात चिटफंड सुरू केला. त्यानंतर महिलांचा विश्वास संपादन करून सुरूवातीच्या काही महिन्याला तीन ते पाच हजार रूपयांत चालणा:या फंडात तुम्ही 1 लाख किंवा 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम भरा आणि पाच ते दहा वर्षात रक्कम दुप्पट घेवून जा असे सांगून जवळपास 2क्क् च्यावर सभासदांकडून 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा केली.  मात्र त्यानंतर पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. 
 
4सभासदांच्या मुलांना बीएसटीमध्ये नोकरी लावतो असे सांगून 24 जणांकडून प्रत्येकी 5क् हजार रूपये घेऊन पोबारा केला. तसेच मोठी रक्कम जमा झाल्यानंतर या आरोपींपैकी वैजयंती हडकर हिने स्वत:च्या मालकीचा नवीन पनवेल येथे फ्लॅटसुध्दा विकत घेतला. परंतु  सभासदांना रक्कम  परत करण्याची वेळ आली असता त्यांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली.