Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी गोष्ट’ आत्मचरित्र प्रकाशित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:07 IST

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड यांच्या ‘माझी गोष्ट’ या आत्मचरित्राचे प्रकाशन, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख ...

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड यांच्या ‘माझी गोष्ट’ या आत्मचरित्राचे प्रकाशन, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहलता देशमुख यांच्या निवासस्थानी, विजया वाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या पुस्तकाचे प्रकाशन केले गेले.

अभिनेत्री-लेखिका निशिगंधा वाड, डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे, साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे सचिव संदेश जाधव आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. माझ्या आयुष्यातल्या सुखदुःखाच्या साक्षीदार असलेल्या स्नेहलताबाईंनी हे पुस्तक प्रकाशित केले याचा मला आनंद होत आहे आणि अशोक मुळे या माझ्या पुत्रवत मित्राने हे पुस्तक काढल्याबद्दल मी त्याची ऋणी आहे, असे मनोगत विजया वाड यांनी या वेळी मांडले. विजया वाड यांचे हे १५२ वे पुस्तक आहे.

------------------------------------------------------------------------