Join us

मस्ट...शालिनी ठाकरेंसाठी शर्मिला ठाकरेंचा रोड-शो

By admin | Updated: October 11, 2014 23:33 IST

मस्ट...सुपरवोट...फोटोसह....फोटो मेलवर आहेत....

मस्ट...सुपरवोट...फोटोसह....फोटो मेलवर आहेत....
.....................................................................................
शालिनी ठाकरेंसाठी शर्मिला ठाकरेंचा रोड-शो
मुंबई: दिंडोशी मतदार संघात मनसे उमेदवार शालिनी ठाकरेंचा दणक्यात रोड शो झाला. निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे चालू असताना दिंडोशीत मनसेच्या इंजिनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शालिनी ठाकरेंच्या रोड-शो मध्ये शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
प्रेस ड्रीम बिल्डींग तानाजी नगर पोलीस चौकी परिसर तसेच बाबा साळवी चाळ परिसर मनसैनिकांनी दणाणून सोडला होता. तरूणांच्या प्रचंड प्रतिसादात ही रॅली पुढे मार्गक्र मण करीत होती. त्यानंतर हनुमान टेकडी-मिथला कंपाऊंड-छत्रपती चाळ कमिटी येथून जिवदानी चाळ कमिटी येथे रॅली संपली. रॅली दरम्यान शालीनी ठाकरे यांनी महिला,ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संपर्क साधला. सेना-भाजप यांची तुटलेली युती तसेच आघाडीत झालेली बिघाडी यावर मनसे हाच स्थिर पर्याय असल्याचे शालिनी ठाकरे यांनी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)