Join us  

मुस्लिमांनो सामाजिक विलगीकरण कसोशीने पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:07 PM

देशातील ८० वरिष्ठ मुस्लिम सनदी आधिकार्यांचे आवाहन

जमीर काझी

मुंबई : कोविड -१९ करोनाच्या संकटामुळे जगभरात अभुतपुर्व परिस्थिती उदभविली असताना देशातील सर्व मुस्लिमांनी सरकारच्या सूचनांचे काटेकोर अवलंब करावे,असे आवाहन  केद्र सरकाच्या सेवेत असलेल्या देशभरातील ८० जेष्ठ मुस्लिम सनदी आधिकार्यानी केले आहे.

दिल्लीतील  निजामुद्दीन मर्कज मधील तबलिग जमातीच्या निमित्याने खोट्या बातम्या,व्हीडीओ क्लिप प्रसारित करून मुस्लिम समुदायाबाबत गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे या आधिकार्यांनी वैयक्तिकपणे देशाची एकात्मता व सोहार्दाचे वातावरण कायम रहाण्यासाठी हे आवाहन केले आहे. त्यासाठी पवित्र ग्रंथ कुराणमधील वचने इ्स्लामचे प्रेषित मंहमद पैंगबर यांच्या शिकवणीचा दाखला  दिला आहे.

याबाबत देशातील विविध राज्यात कार्यरत असलेल्या ८० अधिकार्याच्या नाव आणि त्यांच्या पद व केडरसह सोशल मीडियावरून रविवारी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. निजामुल होंडा ,आसिफ जलाल,सोहेल मालिक यांच्यासह महाराष्ट्र केडर मधील नुरूल हासन (आयपीएस), सुहेल काझी,सुबोर उस्मानी(आयआरएस) या वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे

 त्यामध्ये म्हटले आहे की,गेल्या काही दिवसापासून काही मुसलमान सामाजिक विलगीकरणासाठी(सोशल डिस्ट्रबिग)सहकार्य करीत नाहीत,योग्य खबरदारी घेत नाहीत,असा एक संदेश पसरविला जात आहे,त्याला आधार म्हणून काही व्हि़डीओ क्लिप दाखविल्या जात आहे.वास्चविक या काळात सर्व जनतेने एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची गरज आहे.यावेळी मुस्लिमांनी आपल्यावर कोणताही आरोप होवू न देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. मुस्लिम  समाजाने  आघाडीवर राहून पंतप्रधान व केंद्र सरकार ,डाँक्टरांनी सुचविलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,

संसर्गजन्य आजारपासून स्वत:ला व समाजाला वाचविण्यासाठी प्रेषितांनी केलेल्या अनेक सूचना सुन्नत आणि हदीसच्या माध्यमातून सांगितल्या आहेत,त्यांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,  

कोरोनाचा पादुर्भाव नाहीसा करण्यासाठी सद्या सामुहिक नमाज पठणाला विरोध आहे, पुर्वस्थिती प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मशीदी उघडल्या जातील व सामुदायिक प्रार्थना पुन्हा सर्वाना करता येणार आहेत, मात्र हा रोग नाहिसा होईपर्यत सर्वानी आपली,धरातल्यांची व समाजाची काळजी घ्यावी, असे कळगळीचे आवाहन या सनदी अधिकार्यांनी केले आहे.

---------------------------

रोगाचा फैलाव करणे धर्मविरोधी

एखाद्या आजाराचा आपल्याकडून दुसर्यापर्यत फैलाव करणे,तसेच आत्महत्या करणे धर्माविरोधी व निषिद्ध अाहे. त्याचप्रमाणे एकाही निरपराध माणसाचा जीव घेणे, जिवाला धोका निर्माण करण्याला कुराणने बंदी घातली असल्याचे अधिकार्याच्या निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस