मुंबई : तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवण्याबाबतचा अध्यादेश केंद्र सरकारने काढल्याबाबत मुस्लीम समाजात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. तिहेरी तलाक अध्यादेश काढल्याने मुस्लीम समाजातील मौलानांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.जामिया काद्रिया अश्रफियाचे प्रमुख मौलाना मोईनुद्दीन अश्रफ, रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नुरी, सुन्नी जमैतुल उलेमाचे प्रमुख मौलाना फरीदुज्जमा यांच्या नेतृत्वाखाली नागपाडा जवळील दोन टाकी येथील जामिया काद्रिया अश्रफिया येथे निदर्शने करून सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यात आला.
तिहेरी तलाक आदेशाविरोधात मुस्लिमांत नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 02:28 IST