1मुरूड : दिवाळीला जोडून सलग सुट्टय़ा आल्यामुळे मुरुड पर्यटनस्थळी मुंबई, पुणो येथील पर्यटकांची गर्दी वाढली आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यातही चांगल्याप्रकारे उपस्थिती लावली आहे. पर्यटकांना येथील नारळ, पोफळीच्या हिरवाईचे अप्रुप वाटते. सुमारे अडीच किलोमीटरच्या किना:यावर सध्या सिगल पक्ष्यांचे थवेच्या थवे, आपल्या लयबध्द हालचाली पर्यटकांची विशेष करमणूक ठरत आहे.
2सिगल म्हणजे समुद्र पक्षी. लॅरिडे कुटुंबाचे पक्षी आर्टिक्ट आणि अंटार्टिक खंडात खासकरून आढळतात. याच्या 2क् पेक्षा अधिक प्रजाती असून अत्यंत कुशाग्र बुध्दीचे म्हणून ते ओळखले जातात. ते सामान्यत: करडय़ा नाहीतर पांढ:या रंगाचे असतात. आकाराने मध्यम ते मोठय़ा आकारात अनुक्रमे 12क् ग्रॅम ते 1 कि. 75 ग्रॅम इतके त्यांचे वजन असते. लांबी 29 सेमी ते 76 सेमी एवढी भरते. त्यांच्या पंखाच्या टोकाला काळे ठिबके अधिक आकर्षक दिसतात.
3भक्ष्य पकडण्यासाठी जाळीदार बोटांची त्यांना मदत होते. प्रजनन काळ सप्टें. ते जानेवारी हा 3 ते 5 महिन्यांचा असतो. सीफूडवर ताव मारण्यात या पक्ष्यांचा भर असतो. शिकारीचे कसब आपल्या पिल्लांनीही आत्मसात करण्याची किमया ते सहजपणो संक्रमित करतात. उभयचर प्राणी तसेच सरपटणारे प्राणी ही त्यांच्याकडून फस्त केले जातात.