Join us

हार्बरच्या नेरूळ-मानखुर्द मार्गावर मरेचा मेगाब्लॉक

By admin | Updated: August 16, 2014 22:41 IST

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुलुंड-माटुंगा अप जलद दिशेसह हार्बरच्या नेरूळ-मानखुर्द स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक स. 11 ते दु. 3.3क् या वेळेत घेण्यात येणार आहे.

ठाणो : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुलुंड-माटुंगा अप जलद दिशेसह हार्बरच्या नेरूळ-मानखुर्द स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक स. 11 ते दु. 3.3क् या वेळेत घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्यानंतर अप जलदच्या लोकल धीम्या मार्गावर धावतील. त्या माटुंगानंतर पुन्हा जलद दिशेवरून वळवण्यात येणार आहेत. परिणामी, या लोकल सीएसटीला नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा 2क् मिनिटे विलंबाने पोहोचतील.
हार्बरच्या नेरूळ-मानखुर्द स्थानकांदरम्यान ब्लॉक आहे. त्यामुळे या कालावधीत बेलापूर/पनवेल/वाशी येथून अपमार्गे सीएसटीला तर तेथून डाऊनमार्गे या ठिकाणी जाणा:या लोकल ब्लॉकच्या वेळेत रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसटी-मानखुर्द मार्गावर आणि ट्रान्स-हार्बरच्या ठाणो-पनवेल मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याचे म.रे.च्या जनसंपर्क विभागाने जाहीर केले आहे. 
 
बोरिवली-अंधेरी 
मार्गावर जम्बोब्लॉक
ठाणो : पश्चिम रेल्वेच्या बोरिवली-अंधेरी मार्गावर रविवारी स. 1क्.35 ते दु. 3.35 या कालावधीत जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक पाचव्या मार्गावर असून त्या कालावधीत सिगAल यंत्रणा रुळांसह ओव्हरहेड वायरच्या देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ब्लॉकच्या कालावधीत लांब पल्ल्यांच्या गाडय़ा वरील मार्गावर दोन्ही दिशांवर जलद मार्गावरून धावतील, असेही प.रे.च्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.