Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुरली देवरा यांची प्रकृती गंभीर

By admin | Updated: November 23, 2014 01:23 IST

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे खासदार मुरली देवरा काविळीने आजारी असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे खासदार मुरली देवरा काविळीने आजारी असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
 गेल्या काही दिवसांपासून देवरा आजारी होते. त्यामुळे त्यांना ब्रीच कॅन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असून त्यांना डॉक्टरांनी पूर्ण विश्रंती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. (प्रतिनिधी)