Join us

मार्डचा संप मागे

By admin | Updated: November 28, 2015 01:54 IST

महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टर्सने (मार्ड) दोन दिवसांपासून पुकारलेला संप महत्त्वाच्या तीन मागण्या मान्य झाल्याने शुक्रवारी सायंकाळी मागे घेतला

मुंबई : महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टर्सने (मार्ड) दोन दिवसांपासून पुकारलेला संप महत्त्वाच्या तीन मागण्या मान्य झाल्याने शुक्रवारी सायंकाळी मागे घेतला. गेल्या दोन दिवसांपासून बाह्यरुग्ण विभागात निवासी डॉक्टर कार्यरत नसल्यामुळे रुग्णांचे काही प्रमाणात हाल झाले होते. मार्डने गुरुवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली होती. चर्चा सकारात्मक न झाल्याने शुक्रवारीही निवासी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभागावर बहिष्कार टाकला होता. शुक्रवारी दुपारी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी तावडे यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा केली. या वेळी मार्डच्या तीन प्रमुख मागण्या तावडे यांनी मान्य केली. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक शास्त्राचे प्रमुख डॉ. व्यवहारे यांची बदली करावी, अशी मार्डची प्रमुख मागणी होती. डॉ. व्यवहारे यांची चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली. तिथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी नाहीत. त्याशिवाय रुग्णालयात काम करताना एखाद्या डॉक्टरला क्षयरोग झाला तर त्या डॉक्टरला विशेष रजा देण्याची तसेच महिला डॉक्टरांना प्रसूती रजा देण्याची मागणीही सरकारने मान्य केली. (प्रतिनिधी)