साकीनाक्यातील हत्या झालेला इसम अनोळखी
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
साकीनाक्यातील हत्या झालेला इसम अनोळखी
साकीनाक्यातील हत्या झालेला इसम अनोळखी
साकीनाक्यातील हत्या झालेला इसम अनोळखी मुंबई: अंधेरी पूर्वच्या साकीनाका परिसरात चोरी करताना सापडल्याने झालेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. हा इसम या विभागातील नसल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना अडचणी येत आहेत.हा इसम बिगारी काम करणारा असून तो बाहेरचा असावा, अशी माहिती पुढे आली आहे. याबाबत जवळपासच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये त्याचे फोटो पाठविले असून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरु आहे. तो गिल्बर्ट कंपाऊंडमधील भंगाराच्या गोदामात मंगळवारी सायंकाळी चोरीच्या उद्देशाने शिरला. जेव्हा त्याला रेहनतअली मोहम्मद खली खान (२६), हबीब जरीब शेख (२०), आणि राजकुमार यादव (२४) या तिघांनी पकडून बांधले आणि मारहाण केल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिक तपास सुरु असल्याचे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)