Join us

लग्न मंडपात तरुणाची हत्या

By admin | Updated: May 17, 2017 03:42 IST

लग्नाच्या डेकोरेशनची लाइट बंद करण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला. सोमवारी रात्री हा प्रकार अंधेरीत घडला असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लग्नाच्या डेकोरेशनची लाइट बंद करण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला. सोमवारी रात्री हा प्रकार अंधेरीत घडला असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. अंधेरीत गवसपार दर्गा, धनगरवाडी परिसरात मोहसीन शेख या तरुणाच्या घरी लग्नसोहळा होता. त्या वेळी दोन व्यक्ती लग्नाच्या डेकोरेशनची लाइट बंद करण्यावरून वाद घालू लागले. मोहम्मद अंजुम वडारी आणि सादिक या दोन तरुणांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी वडारी याच्या डोक्यात बिअरची बाटली मारली, तसेच सादीकवरदेखील हल्ला केला आणि पसार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी वडारीला मृत घोषित केले.