Join us
Daily Top 2Weekly Top 5

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:05 IST

मुंबई : माहीम लिंक रोड परिसरात शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पैशांवरून झालेल्या वादातून मस्जिद यामिन खान (१८) याला लाकडी ...

मुंबई : माहीम लिंक रोड परिसरात शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पैशांवरून झालेल्या वादातून मस्जिद यामिन खान (१८) याला लाकडी फळी, वायरने मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी माहीम पोलिसांनी २८ वर्षीय मित्राला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

...................................................................

व्हिडीओ व्हायरल करू नका!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहेत. याप्रकरणी बंगलोर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, नागरिकांनी व्हिडीओ व्हायरल करू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने केले आहे. हा कायद्याने गुन्हा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

..........................................................................

दुचाकी पार्किंगच्या वादातून हल्ला

मुंबई : गोवंडीत दुचाकी पार्क करण्याच्या वादातून त्रिकुटाने राहुल आक्षे (२२) या तरुणावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना गुरुवार, २७ मे राेजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.....................................................