Join us  

घाटकोपरमध्ये महिलेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 6:16 AM

घाटकोपरच्या नारायणनगर परिसरात २० वर्षीय मीनाक्षी चौरसिया यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

मुंबई : घाटकोपरच्या नारायणनगर परिसरात २० वर्षीय मीनाक्षी चौरसिया यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला आहे.चौरसिया या नारायणनगर परिसरात राहत होत्या. रविवारी सकाळी ७च्या सुमारास त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. घटनेची माहिती मिळताच, घाटकोपर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत, शविविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात आहेत. शिवाय, त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि कुटुंबीयांकडे पोलीस अधिक तपास करत आहेत.