Join us

विवानच्या हत्येप्रकरणी त्याच्या काकीला अटक

By admin | Updated: June 30, 2017 13:13 IST

विवान संदीप कांडू या दीड वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी त्याच्या काकीला मालाड पोलिसांनी अटक केली.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 30 -  विवान संदीप कांडू या दीड वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी त्याच्या काकीला मालाड पोलिसांनी अटक केली. इंदु धर्मेंद्र गुप्ता (३६) असे तिचे नाव असून तिने असे का केले याची चौकशी पोलीस करीत आहेत. कारण अद्याप तिने गुन्हा कबुल केला नसला तरी परिस्थितीजन्य पुराव्यावरुन ही अटक करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 
मालाड पश्चिमच्या काचपाडा परिसरात कुटुंबासोबत राहणारा विवान सोमवार संध्याकाळपासून गायब होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्याच्या मृतदेह त्याचा काका धर्मेद्र याच्या घराजवळ एका गोणीमध्ये सापडला.