Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून दुकानदाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:05 IST

आरेतील घटना : चाेराच्या चाैकशीतून झाला उलगडालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनैतिक संबंधातून एका दुकानदाराची हत्या करत त्याचा ...

आरेतील घटना : चाेराच्या चाैकशीतून झाला उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अनैतिक संबंधातून एका दुकानदाराची हत्या करत त्याचा मृतदेह जमिनीत गाडण्यात आला. या हत्येचा उलगडा एका चोराच्या चौकशीदरम्यान झाला असून त्याला आरे पोलिसांनी अटक केली.

आरे कॉलनीत रवी सबडे नामक व्यक्ती दुकान चालवायचा. ज्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या घटस्फोटित महिलेशी अनैतिक संबंध होते. त्याच परिसरात रेकी करण्याच्या उद्देशाने मुबारक सय्यद उर्फ बाबू आणि त्याचा साथीदार अमित शर्मा उर्फ बिडी फिरायचे.

या दरम्यान मुबारकची घटस्फोटित महिलेशी मैत्री झाली. त्याचे तिच्यावर प्रेम जडले. मात्र त्याला रवीबाबत समजल्यावर त्याचे रवीसाेबत भांडण झाले आणि त्याचा काटा काढण्याचे ठरवून त्याने जोगेश्वरी परिसरात रवीला बोलावले. तेथे दगडाने ठेचून त्याची हत्या करून मृतदेह पुरून टाकला.

चोरीप्रकरणी शर्मासह मुबारकला आरे पोलिसांनी नुकतीच अटक केल्यानंतर चाैकशीत त्याने हत्या केल्याची कबुली दिली.

..................................