Join us

अनैतिक संबंधांच्या संंशयावरुन हत्या

By admin | Updated: September 1, 2014 22:45 IST

अनैतिक संबंधांच्या संंशयावरुन हत्या

अनैतिक संबंधांच्या संंशयावरुन हत्या

विक्रोळी: पत्नीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या संंशयावरुन एका ३३ वर्षीय इसमाची भरवस्तीत निघृर्ण हत्या करण्यात आल्याची घटना विक्रोळीमध्ये उघड झाली. याप्रकरणी मोहम्मद शरीफ खलील अहमद अन्सारी (६०)च्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मदचा शोध पोलीस घेत आहेत.
मोहम्मद नहीम उर्फ कल्लू मोहम्मद नसीम शेख (३३) असे मृत इसमाचे नाव असून तो विक्रोळी टागोर नगर २ येथील अब्दुला चाळीत राहण्यास होता. सोमवारी पाचच्या सुमारास शेजारी राहणार्‍या अन्सारीने त्याला आपल्या पत्नीपासून दूर राहण्याबाबत सांगितले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अशातच जवळच असलेल्या कोयत्याने अन्सारीने त्याच्यावर वार करण्यात सुरुवात केली. लोक जमताहेत पाहून त्याने घटनास्थळाहून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेखला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
शेख याचा गारमेंटचा व्यवसाय होता. पत्नीसोबत शेखचे अनैतिक संबंध असल्याच्या संंशयाने दोघांमध्ये अनेकदा शाब्दिक बाचाबाचीही झाली आहे. त्याच संंशयावरुन अन्सारीने शेखची हत्या करत पळ काढल्याची माहिती विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश देसाई यांनी दिली. अन्सारीचा कपड्यांवर नक्षीकाम करण्याचा व्यवसाय आहे. (प्रतिनिधी)